औरंगाबाद- देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर गोमातेच्या नावाखाली मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार, हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुस्लिमांना असुरक्षित वाटत आहे. आपली बाजू घेणारा पक्ष असावा असे मुस्लिमांना वाटू लागले आहे. गेल्या पाच वर्षांत एमआयएम पक्षाने मुस्लिम बहूल भागात शिरकाव केला. पण अलिकडच्या काळात एमआयएमकडून मुस्लीम जनतेच्या ज्या इच्छा होत्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे एमआयएमला शह देण्यासाठी समाजवादी पार्टी पुन्हा जोमाने कामाला लागली असल्याचे दिसते. मुस्लिमांना आरक्षण हा मुद्दा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहे.
एमआयएम हा हैदराबादमधील पक्ष तर समाजवादी पार्टी ही उत्तर
प्रदेशातील पक्ष मुस्लीम मतांचा काँग्रेस पक्षाने सत्तेसाठी वापर करून घेतला पण
त्यांचा आर्थिक विकज्ञास मात्र केला नाही. त्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते
मुलायसरसिंह यादव, व बसपाच्या नेत्या
मायावती यांनी उत्तरप्रदेशात मुस्लिमांना विधानसभा आणि लोकसभेत मोठे प्रतिनिधीत्व
दिले. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात आज सपा, बसपाकडे आकर्षित झाला आहे. त्यामुळे
काँग्रेसचा परंपरागत व्होट बँक फुटली. गेल्या दहा-पंधरा वर्षांत समाजवादी पार्टीने
महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांत नगरसेवक तर मुंबईसारख्या ठिकाणी तीन आमदारही
निवडून आणले. पण सपा ही पार्टी उत्तर प्रदेशापुरतीच मर्यादीत राहिल्याने
महाराष्ट्रात ती वाढू शकली नाही.
गेल्या २० वर्षांपासून अबू
आजमी हे सपाचे काम सांभाळत आहे. पण गेल्या पाच वर्षांत राज्यात एमआयएम या पक्षाने
राज्यात काही नगरपालिकांमध्ये सदस्य निवडून आणले व दोन आमदारही निवडून आणले.
एमआयएमचे अध्यक्ष खा. असदोद्दिन ओवेसी यांच्या जहाल भाषणामुळे मुस्लीम समाजातील
युवक आकर्षित झाले. पण एमआयएमनेही राज्यातील मुस्लीम युवकांच्या रोजगारासाठी, शिक्षणासाठी व त्यांच्यावरील
अन्यायासाठी काही केले नसल्याची जाणीव युवकांना होऊ लागली. त्यामुळे समाजवादी
पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आजमी यांनी एमआयएमकडे आकर्षित झालेला मुस्लीम समाज
पुन्हा समाजवादी पार्टीकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
रविवारी औरंगाबादेत समाजवादी पार्टीची राज्यस्तरीय बैठक घेतली व
आगामी निेवडणुकीबाबत चर्चा केली. एमआयएम पक्षाने वंचित आघाडीत सहभाग घेतला आहे. पण
वंचित आघाडीमुळे भाजपाला लाभ होणार असल्याचे समाजवादी पार्टीच्या नेत्यांना वाटते.
त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत जातीयवादी शक्ती पुन्हा सत्तेत येऊ नये यासाठी सपा
राज्यभर सभा,
मेळावे घेऊन जनजागृती करणार आहे. तसेच
पक्षाची बांधणीही करणार असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. समाजवादी
पार्टी सक्रिय झाल्यास त्याचा फटका एमआयएमलाच बसणार आहे. मुस्लीम समाजाला
काँग्रेसच्या राजवटीत आरक्षण दिले होते. पण नंतर ते थांबविण्यात आले. त्यामुळे आता मुस्लीम समाजात ही आरक्षणाची
मागणी जोर धरून आहे. आरक्षणाच्या मुद्यावर जो पक्ष मदत करेल त्याच्या सोबत मुस्लीम
युवक जातील असेही जनतेत बोलले जात आहे.